Raj Thackeray Voice To Har Har Mahadev : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटासह ‘राम सेतू’ आणि ‘थँक गॉड’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनात ‘हर हर महादेव’ पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट अखेर दिवाळीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आता चित्रपटाच्या निर्मात्याने प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी राज ठाकरेंच्या दमदार आवाजाची जोड देत चित्रपटाचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सरसेनापती बाजी प्रभू देशपांडे यांची कथा दाखवणाऱ्या या चित्रपटात शरद केळकर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. शरद केळकर नेहमीप्रमाणे त्यांच्या अभिनयाने वाहवा मिळवत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि संस्थापक राज ठाकरे यांच्या आवाजाने या उत्साहवर्धक कथेची गर्जना आणखी वाढण्यास मदत झाली आहे.
हेही वाचा – Twitter ताब्यात घेताच एलोन मस्क यांनी भारतीय CEO ला कामावरून काढलं!
सह्याद्रीच्या नजरेतून आणि मा. राज ठाकरे साहेब यांच्या बुलंद आवाजातून सादर होत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या महापराक्रमाची गाथा ‘हर हर महादेव’.
लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या शिवमंत्राची गाथा मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून सर्वत्र प्रदर्शित. pic.twitter.com/ACYogYT6iT
— Zee Talkies (@ZeeTalkies) October 27, 2022
‘हर हर महादेव’मध्ये सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराज आणि शरद केळकर बाजी प्रभू देशपांडे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे हे मराठी इंडस्ट्रीत मोठे नाव असले, तरी या चित्रपटातील प्रमुख अभिनेता शरद केळकर याला हिंदी पट्ट्यात चांगलेच ओळखले जाते.
चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर शरद केळकरच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्याचवेळी, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जवळपास १.२० कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच दोन दिवसांत मराठी पॅन इंडिया चित्रपटाने केवळ ३.२० कोटींची कमाई केली आहे.