आमदार बच्चू कडू गोत्यात..! पोलिसांसमोरच नागरिकाला थोबडावलं; Video व्हायरल

WhatsApp Group

MLA Bachchu Kadu Viral Video : महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ थांबलेला नाही. या सगळ्यात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. वास्तविक कडू यांनी अमरावतीत एका नागरिकाला कानाखाली लगावली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गावातील विकास कामावरून वाद झाला आणि नंतर कडू यांनी त्या व्यक्तीला कानाखाली मारल्याचे बोलले जात आहे.

राज्याचे आमदार बच्चू कडू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात कडू एका व्यक्तीच्या कानाखाली मारताना दिसत आहेत, ”आधी ऐक, गप्प बस”, असं म्हणतानाही कडू दिसून येतात. ही संपूर्ण घटना अमरावती जिल्ह्यातील गणोजा गावातील आहे. हा वाद गावच्या विकास कामावरून झाला.

हेही वाचा – Meesho वरून मागवला ड्रोन, पार्सल उघडताच निघाले बटाटे..! Video व्हायरल

गावातील विकासकामांच्या वादातून बच्चू कडू यांनी नागरिकाला कानाखाली मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आधी तो प्रहार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळाली होती मात्र नंतर तो स्थानिक नागरिक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये किती तथ्य आहे याची पुष्टी ‘वाचा मराठी’ करत नाही.

Leave a comment