MHADA Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळ क्षेत्रातील 5,309 घरांच्या सोडतीची जाहिरात शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. तसेच या दिवसापासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. 7 नोव्हेंबरला सोडत निघण्याची शक्यता आहे. मे 2023 मध्ये कोकण विभागात 4,654 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. मात्र, लॉटरीमधील अनेक घरांची विक्री झाली नाही. शिवाय, प्रथम प्राधान्य आणि म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील घरांना अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या सोडतीतील उर्वरित घरांसाठी तसेच म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उपलब्ध असलेल्या घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला.
जुलै-ऑगस्टमध्ये सोडत काढण्यात येणार होती. मात्र, काही कारणास्तव या सोडतीला विलंब झाला. कोकण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये 5,309 घरांची सोडत काढण्यात येणार असून, या घरांची जाहिरात शुक्रवार, 15 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. शुक्रवारपासूनच अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा – बाईक, स्कूटर घेणाऱ्यांनो जरा थांबा! लवकरच कमी होऊ शकतात किमती
सोडतीमध्ये EWS, अल्प उत्पन्न गट, मध्यम आणि उच्च अशा चारही उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे, तर 20 टक्के घरे सर्वसमावेशक योजना, प्रथम प्राधान्य, म्हाडा गृहनिर्माण आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील आहेत.
अर्ज विक्री आणि स्वीकृतीची तारीख
या सोडतीसाठी 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून ते 16 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री अकरा वाजून 59 मिनिटांपर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
ऑनलाइन अनामत रकमेची भरणा करण्याची अंतिम तारीख
18 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून 59 मिनिटांपर्यंत ऑनलाईन अनामत रकमेची भरणा करता येईल.
बँकेत अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख
आरटीजीएस व एन इ एफ टी द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक 18 ऑक्टोबर आहे. बँकेच्या कार्यालयीन वेळेत या तारखेपर्यंत अनामत रक्कम भरता येणार आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!