MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या लॉटरीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रत्येकजण या गोष्टीची वाट पाहत होते. ऑक्टोबरमध्ये म्हाडाची सोडत आहे. तब्बल 10 हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. यापैकी पुण्यातील 5000, कोकण मंडळाच्या 4500 आणि औरंगाबाद मंडळाच्या 600 घरांचा समावेश आहे. ऑगस्टच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याची जाहिरात निघेल. त्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. ऑक्टोबरमध्ये लॉटरीचा निकाल जाहीर होईल.
25 ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 10 हजार घरांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल. यामध्ये पुण्यातील सर्वाधिक 5000 घरांचा समावेश आहे. ही घरे शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि यात अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे.
हेही वाचा – चीनची कंपनी भारतात घालणार धुमाकूळ, आणतेय 700 किमी रेंजची गाडी!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या घरांची किंमत थोडीफार कमी झाली पाहिजे, असे मत दिले होते. नुकताच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात 4082 घराचा समावेश होता. फडणवीसांच्या मते नवीन सोडतमध्ये घरांचे दर कमी असणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!