Mazagon Dock Recruitment 2022 : माझगाव डॉकमध्ये १०४१ पदांसाठी भरती..! ‘असा’ करा अर्ज

WhatsApp Group

Mazagon Dock Recruitment 2022 : सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात अनेकजण आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी सर्वांपासून चुकते. त्यामुळेच ‘वाचा मराठी’नं पुढाकार घेत, नोकरीची संधी आणि त्याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेला तरुणवर्ग खालील ठिकाणी अर्ज करु शकतील.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं (MDL) कुशल आणि अर्ध-कुशल (Skilled and Semi-Skilled) पदांच्या १०४१ रिक्त पदांसाठी भरती केली आहे. या भरतीसाठी अधिकृत वेबसाइट mazagondock.in ला भेट द्या आणि ऑनलाइन अर्ज करा. तुम्ही आजपासून म्हणजेच १२ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. या अधिसूचनेनुसार, एकूण १०४१ जागा रिक्त आहेत. या अंतर्गत मेकॅनिक, फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर आणि ऑपरेटर या पदांवर भरती होणार आहे.

हेही वाचा – SL Vs PAK : पराभव बोचला..! PCB अध्यक्षांनी भारतीय पत्रकाराचा फोन हिसकावला; म्हणाले, “तुम्ही तर…”

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता

संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

वय श्रेणी

१ सप्टेंबर २०२२ रोजी उमेदवारांचं वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावं. वय किमान १८ वर्षे असावं.

हेही वाचा – रत्नागिरीत दोन एसटी बस समोरासमोर जोरात धडकल्या..! शाळकरी मुलांसह प्रवासी जखमी

निवड कशी केली जाईल ते जाणून घ्या

३० गुणांची लेखी परीक्षा होईल. जहाज बांधणी उद्योगातील अनुभवास २० गुण मिळतील. ट्रेड टेस्ट ५० गुणांची असेल.

अर्ज कसा करायचा?

सर्वप्रथम उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://mazagondock.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. यानंतर, विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील. तुमची कागदपत्रे, फोटो स्वाक्षरी अपलोड करा. तुम्ही कोणत्या श्रेणीतील आहात, त्यानुसार शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment