Objectionable Tweets Against CM Eknath Shinde And Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ट्वीट करणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रदीप भालेकर असे आरोपीचे नाव आहे. त्याने ट्विटरवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. पोलीस त्याचा शोध घेत होते. आरोपी त्याच्या ट्विटर हँडलवर वेगवेगळ्या राजकारण्यांना शिवीगाळ करत असे. पोलिसांनी प्रदीप भालेकर याचा मोबाईल जप्त केला आहे. प्रदीपवर मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास समतानगर पोलीस करत आहेत.
मुंबई गुन्हे शाखा युनिट १२चे निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले की, प्रदीप भालेकर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. प्रदीपने ट्विटरवर राज्यपालांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पक्षाच्या आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार एकवटले. त्यानंतर शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर उद्धव यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडीचे सरकार पडले.
हेही वाचा – Video : बोरिवलीमध्ये इमारतीचा एक भाग कोसळला; ४-५ गाड्यांचं नुकसान!
नवीन सरकारमध्ये शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. नुकत्याच झालेल्या अंधेरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने पक्षावर दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षाची नवीन नावे आणि चिन्हे दिली.