खारेपाटणच्या विद्युत केंद्राला ‘भीषण’ आग; सिंधुदुर्गातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित

WhatsApp Group

Kharepatan Power Station Fire : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील वीज केंद्राला आज गुरुवारी (२२ सप्टेंबर) अचानक आग लागली. ही आग इतकी वाढली की त्यातून भीषण ज्वाळा येत होत्या. या केंद्रातून अनेक गावांना वीज पुरवठा होतो. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या केंद्रातील आगीला आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्गातील अनेक गावांचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे.

महावितरणचे वरिष्‍ठ अधिकारी देखील खारेपाटणला पोहोचले. दरम्‍यान या आगीतून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. तसेच स्फोटाचे आवाज येत असल्‍याने येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला असून महावितरण कर्मचाऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्‍न सुरू आहेत.

हेही वाचा – काय सांगता..! हार्दिक पंड्यामुळं बिहारचं पोरगं रातोरात बनलं करोडपती!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment