Maharashtra Weather Updates : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; कोकणात ‘या’ ठिकाणी ‘ऑरेंज’ अलर्ट!

WhatsApp Group

Maharashtra Weather Updates : आज मंगळवारी सकाळी मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस झाला आणि भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) मुंबईत आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीनं रायगड, रत्नागिरी आणि सातारा साठी ‘ऑरेंज अलर्ट’ देखील जारी केला आहे. या तीन जिल्ह्यांतील मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलं, की येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्रीही मुंबईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याचा अंदाज

मुंबईतील हवामान विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेनं मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांच्या कालावधीत ९३.४ मिमी पावसाची नोंद केली असून, चालू पावसाळ्यात येथे मुसळधार पावसाची आणखी एक फेरी झाली आहे. आयएमडीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं, की कुलाबा वेधशाळेत याच कालावधीत ५९.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आयएमडीनं मंगळवारी मुंबईत मध्यम आणि शेजारील रायगडमध्ये अति तीव्रतेच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा – NABARD Recruitment 2022 : नाबार्डमध्ये १७७ जागांसाठी भरती..! पगार ३२,००० रुपये; ‘असा’ भरा अर्ज!

हवामान खाते सध्याच्या हवामान प्रणालीच्या आधारे चार रंगांवर आधारित अंदाज जारी करते. ‘हिरवा’ रंग म्हणजे कोणताही इशारा नाही, ‘पिवळा’ रंग सावध राहण्यासाठी, ‘केशरी’ रंग सावध राहण्यासाठी, तर ‘लाल’ रंग इशारा आणि त्यावर कृती करण्याची आवश्यकता दर्शवतो. भारतीय हवामान खात्यानं महाराष्ट्रासह गुजरात, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

दक्षिण ओदिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट आहे. कोकणात काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे.

या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

रायगड, रत्नागिरी, सातारा

या जिल्ह्यांत येलो अलर्ट

पुणे, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा. चंद्रपूर, गडचिरोली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment