Maharashtra Weather : महाराष्ट्रात तापमानात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी होती. यासोबतच राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरणही दिसून आले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा प्रकोप पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून येत आहे. 2023 च्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील लोक शेकोटीचा सहारा घेत आहेत.
अनेक भागात तापमानात घट
महाराष्ट्रातील विविध प्रमुख शहरांमध्ये थंडी पडत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या राज्यातील प्रमुख शहरांच्या तापमानात कमालीची घट झाली आहे. याबाबतची अधिकृत माहिती हवामान खात्याने दिली आहे. इतकेच नाही तर गेल्या 9 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद हवामान खात्याने केली आहे.
हेही वाचा – ही घ्या खुशखबरी..! आज लाँच होणार नवी आणि स्वस्त Mahindra Thar; ‘अशी’ करा बुकिंग
विदर्भात यलो अलर्ट
विदर्भात थंडी पडू लागली आहे. विदर्भात पारा 7 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. दरम्यान, विदर्भात थंडीचा पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे. यापूर्वी 2014 मध्ये विदर्भात एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली होती मात्र आता तब्बल 9 वर्षांनंतर विदर्भात एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्राप्रमाणेच देशातील अनेक भागात तापमानात घट झाली आहे. पंजाबच्या अनेक भागात दाट धुके अपेक्षित आहे. तसेच, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या विविध भागात धुके पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण उत्तर भारत कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये अचानक थंडी वाढली आहे. उत्तर भारतात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.