संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, आता सर्व उपचार, टेस्ट मोफत! जाणून घ्या…

WhatsApp Group

Maharashtra : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात आता सर्व शासकीय रुग्णालयात उपचार पूर्णपणे मोफत होणार आहेत. ही योजना 15 ऑगस्टपासून राज्यात लागू करण्यात येणार असून, त्यानंतर राज्य सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार आणि चाचण्या मोफत होतील, अशी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला असून, त्यात भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अन्वये नागरिकांच्या आरोग्याच्या अधिकाराला मान्यता देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील गरीब, गरजू आणि रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, महिला रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालये आणि कर्करोग रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातील. नाशिक आणि अमरावती येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्येही मोफत उपचार केले जाणार आहेत. सध्या या सर्व रुग्णालयांमध्ये वर्षभरात सुमारे 2 कोटी 55 लाख नागरिक उपचारासाठी येतात. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण 2418 संस्था असून, या सर्व ठिकाणी रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत.

हेही वाचा – Horoscope Today : संकष्टी चतुर्थीला ‘या’ ४ राशींवर बाप्पाचा आशीर्वाद, वाचा दैनिक राशीभविष्य 

शस्त्रक्रियाही मोफत

आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांना बिल भरण्यासाठी दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागते. या सर्वांचा हिशोब केला तर दरवर्षी 71 कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा होतात. मात्र रांगेत उभे राहिल्याने अनेकदा उपचारास विलंब होतो. पीएचसी ते जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये केसपेपर शुल्कापासून शस्त्रक्रियेपर्यंत मोफत उपचार होतील, असे त्यांनी सांगितले. हा निर्णय आरोग्य विभागाचा असून त्याअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांना हा निर्णय लागू राहणार आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही सेवा उपलब्ध नसून मोफत उपचारासाठी आधार कार्ड दाखवावे लागणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सरकारवर किती कोटींचा बोजा?

आरोग्य विभागाचे अंदाजे 12 ते 13 हजार कोटींचे बजेट आहे. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी 100 ते 150 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मात्र, आम्ही हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment