Diwali 2022 : एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर..! मिळणार दिवाळी बोनस; वाचा सविस्तर!

WhatsApp Group

Diwali 2022 : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून प्रत्येकजण खरेदीमध्ये व्यस्त आहे. कंपन्यांमध्ये नोकरी करणारे लोक, कंपनी छोटी असो वा मोठी, सर्वांना दिवाळीनिमित्त बोनसची अपेक्षा असते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही ही दिवाळी आनंदाची ठरणार आहे. कारण सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या महिन्याचे वेतन २१ ऑक्टोबरलाच देण्याचे निर्देश दिले आहेत. आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनससाठी ४५ कोटी रुपयेही मंजूर केले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीने जोर पकडला होता, ऐन दिवाळीत संपाची हाक देत एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर बेमुदत संप सुरू केला होता. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनात सहभागी होऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मांडल्या. पडळकर म्हणाले की, राज्यात सरकार आल्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांपैकी १६ मागण्या आम्ही मंजूर केल्या आहेत. सरकारने दिवाळी बोनससाठी ४५ कोटी रुपये मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

हेही वाचा – नाशिकमध्ये मुलींसाठी ‘इतक्या’ क्षमतेचे वसतिगृह सुरू होणार..! चंद्रकात पाटलांची घोषणा

आघाडी सरकारने निर्माण केलेला कोरोना, संप, न्यायालयीन कोंडीतून सुटका झाल्यानंतर माझ्या एसटी कर्मचारी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ शेअर करताना पडळकर म्हणाले की, यंदाची दिवाळी धमाकेदार करण्यासाठी बोनससाठी ४५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो.

Leave a comment