ट्रेनचं इंजिन थेट शेतात घुसलं..! सोलापूरात घडला अपघात; पाहा VIDEO

WhatsApp Group

Maharashtra Solapur Train Accident : महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये मालगाडीचं इंजिन रुळावरून घसरलं आणि थेट जवळच्या शेतात धडकलं. इंजिनासोबतच मालाने भरलेल्या काही वॅगन्सही रुळावरून घसरल्या. सोलापूरजवळील करमाळा येथे हा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. या अपघातात कोणतीही गंभीर दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही ही दिलासादायक बाब आहे. ही मालगाडी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम गावातून जात होती, तेव्हा हा अपघात झाला

काय होतं मालगाडीत?

अचानक इंजिन रुळावरून घसरलं आणि जवळच्या शेताकडं वळलं. इंजिनसह काही मालवाहू डबेही रुळावरून घसरले. हा अपघात आज (रविवार, ४ सप्टेंबर) सकाळी घडला. मालगाडी सिमेंटच्या गोण्यांनी भरलेली होती. रेल्वे मार्गाच्या बाजूला मानवी वस्ती नव्हती, शेततळं असल्यानं अनेक अनुचित प्रकार टळला, ही दिलासादायक बाब आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. ब्रेक निकामी झाल्यामुळं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या रेल्वेचं इंजिन रुळावरून उतरून शेतात गेल्यानं येथून जाणाऱ्या काही गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. रेल्वे वाहतूक सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

ही मालगाडी सोलापूरहून पुण्याकडं जात होती. हा अपघात कशामुळं झाला आणि कोणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे. सध्या अपघातग्रस्त झालेल्या पहिल्या मालगाडीचे इंजिन आणि डबे रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आणि लोकांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे अधिकारी आणि बचाव पथक युद्धपातळीवर काम करत आहेत. रेल्वे रुळाच्या बाजूला मानवी वस्ती नसल्यामुळं मोठी दुर्घटना टळली. जवळपास शेतजमीन असल्यानं कोणीही जखमी झालं नाही तसेच जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment