महाराष्ट्रातील रत्नागिरीची प्रियंवदा अशोक म्हाडदळकर UPSC 2021 मध्ये 13 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन वयाच्या 31 व्या वर्षी IAS अधिकारी बनली. तिने दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले. मुंबईतील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. केल्यानंतर तिने आयआयएम बंगळुरूमधून एमबीए केले. एमबीएनंतर प्रियंवदा (IAS Priyamvada Ashok Mhaddalkar Success Story) एका इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्ममध्ये नोकरी मिळाली. तिने 6 वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये काम केले.
प्रियंवदाने एक दिवस IAS होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. इन्व्हेस्टमेंट बँकरसारखी उच्च पगाराची नोकरी सोडून तिने 2020 मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. तिचे वडील महाराष्ट्र सरकारमध्ये कर्मचारी होते. प्रियंवदाला नागरी सेवेत रुजू होण्याची प्रेरणा तिच्या वडिलांकडून मिळाली. वयाच्या पाचव्या वर्षापासून तिला कलेक्टर व्हायचे होते. पण परिस्थिती आणि योगायोगामुळे इंजिनीअरिंग आणि एमबीए केल्यानंतर अनेक वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात तिने काम केले.
प्रियंवदाने यूपीएससी मेन्समध्ये समाजशास्त्र हा पर्यायी विषय म्हणून ठेवला होता. तिला यूपीएससीमध्ये 2025 पैकी 1024 गुण मिळाले. तिला UPSC मेन्समध्ये 826 आणि मुलाखतीत 275 पैकी 198 गुण मिळाले होते. यूपीएससीच्या तयारीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळापत्रक बनवणे, असे तिचे मत आहे. ज्याचे नियमित पालन केले पाहिजे. यूपीएससीसाठी नोट्स बनवण्यावरही ती खूप जोर देते. नोट्स स्वतःच्या शब्दात बनवायला हव्यात. त्यामुळे विषय समजून घेणे आणि दीर्घकाळ लक्षात ठेवणे सोपे होते, असे प्रियंवदाने मत आहे.
हेही वाचा – जगातील सर्वात मोठे कॉर्पोरेट ऑफिस तयार! पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन
”तुम्ही अभ्यास केलेला विषय लिहिण्याचा सराव केला की संकल्पना स्पष्ट होते. तसेच, जर नोट्स स्वतः बनवल्या असतील तर ते नंतर उजळणीसाठी खूप मदत करते. मॉक टेस्ट दिल्याने उत्तरे चांगल्या प्रकारे तयार होण्यास मदत होते. यामुळे आत्मविश्वासही वाढतो. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी स्वतःला प्रेरित आणि सकारात्मक ठेवले पाहिजे, प्रवास लांब आणि कठीण आहे, म्हणून धीर धरावा लागेल”, असे प्रियंवदाने सांगितले.
प्रियंवदा दररोज 9 ते 10 तास अभ्यास करायची. नागरी सेवेच्या परीक्षेत बातम्या आणि चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सातत्य आणि दिनचर्या आवश्यक असते. या सातत्यामुळे प्रियमवदाला अनेक प्रकारे मदत झाली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!