भारतात अनेक आश्चर्यकारक मंदिरे आहेत, त्यापैकी अनेक तुम्ही पाहिली असतील. पण तुम्हाला अशा मंदिराविषयी माहिती आहे का, जिथे देवाच्या मूर्तीचे दर्शन घेणे खूप कठीण आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ल्यात (Maharashtra Pune Harihar Fort Temple) आहे, तिथे जाण्याचा रस्ता अतिशय धोकादायक आहे. ट्रेकिंग करताना थोडीशी चूक प्राणघातक ठरू शकते.
हरिहर किल्ला हा नाशिकचा महत्वाचा किल्ला आहे. दगड कापून बनवलेल्या पायऱ्यांमुळे अनेक पर्यटक येथे येतात. मंदिरात जाण्यासाठी त्यांना या 80 अंशात उंच कातळपायऱ्या चढाव्या लागतात, ज्यांची संख्या सुमारे 117 आहे. या पायऱ्या चढणे अजिबात सोपे नाही. या कारणास्तव, हा भारतातील सर्वात धोकादायक ट्रेकिंगपैकी एक मानला जातो. गडावर जाणाऱ्या या पायऱ्यांमध्ये आधारासाठी ठिकठिकाणी चर बनवण्यात आले असून ते धरून लोक वर चढतात.
हेही वाचा – SIP Vs PPF : महिना 5000 हजार गुंतवले, तर 15 वर्षांनंतर किती मिळतील?
या पायऱ्या चढून गेल्यावर समोर एक दरवाजा आहे, इथून थोडे पुढे गेल्यावर पुन्हा काही पायऱ्या येतात. या पायऱ्या चढून गेल्यावर लोक किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी पोहोचतात आणि त्यानंतर ते गडाच्या पठारावर पोहोचतात. थोडं पुढे गेल्यावर हनुमान आणि शंकराचं छोटंसं मंदिर आहे. समोर पाण्याचे तळे आहे. हरिहर किल्ला यादव वंशाच्या काळात बांधला गेला.
हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी 1636 साली निजामशाहीची पुनःस्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिकला. हा गड 3676 फूट आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!