ब्रेकिंग..! उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळालं नवं नाव आणि चिन्ह; शिंदे गटाचं नावही ठरलं!

WhatsApp Group

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे नावही जाहीर करण्यात आले आहे. आता उद्धव ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह ‘मशाल’ असेल. तसेच त्यांच्या पक्षाचे नाव शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असेल.

शिंदे गटाच्या नावाचीही घोषणा 

याशिवाय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाचे नावही जाहीर केले आहे. आता एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे संबोधले जाईल. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ११ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत तीन नवीन चिन्हांची यादी सादर करण्यास सांगितले आहे. यानंतर शिंदे गटाचे निवडणूक चिन्ह जाहीर होणार आहे.

हेही वाचा –  ICC चा ‘हा’ अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलीय हरमनप्रीत कौर!

निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला तीन पर्यायी चिन्हे आणि नावे देण्यात आली. मात्र निवडणूक आयोगाने ‘त्रिशूल’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘गदा’ देण्यास नकार दिला होता. कारण ही निवडणूक चिन्हे मुक्त चिन्हांच्या यादीत नाहीत. आता निवडणूक आयोगाने पुन्हा एकनाथ शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हाच्या सूचना मागवल्या आहेत.

विशेष म्हणजे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन निवडणूक आयोगाने आपल्या पक्षाचे नाव ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या वापरावर बंदी घालण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत आयोगाच्या ८ ऑक्टोबरच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पूर्णपणे उल्लंघन करून आणि पक्षकारांचे म्हणणे न ऐकता आणि त्यांना पुरावे सादर करण्याची संधी न देता हा आदेश जारी करण्यात आला, असा युक्तिवाद करण्यात आला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment