Maharashtra Police Recruitment : पोलीस भरतीची तारीख जाहीर..! ‘अशा’ आहेत महत्त्वाच्या अटी

WhatsApp Group

Maharashtra Police Recruitment : महाराष्ट्रात १४,९५६ पोलीस शिपाई पदांची भरती होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या भरतीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या एकूण जागांपैकी ६ हजार ७४० पदे मुंबई तर ७२० पदे पुणे शहरात भरली जाणार आहेत. सर्वात जास्त जागा ह्या मुंबई पोलिसांत भरल्या जातील.

२०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी राज्य पोलीस मुख्यालयाने जाहीर केली आहे. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात ५ हजार ४६८ पदांचा समावेश आहे. १ नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. याच तारखेला जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तशा सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या अटी

३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जदार एकाच विभागात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.  www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भरतीसाठीची माहिती मिळणार आहे.

हेही वाचा – ‘हर हर महादेव’ चित्रपटासाठी राज ठाकरेंनी ‘असा’ रेकॉर्ड केला आवाज..! पाहा व्हायरल Video

कोणाला किती जागा?

  • अनुसूचित जाती – १८११
  • अनुसूचित जमाती – १३५०
  • विमुक्त जाती (अ) – ४२६
  • भटक्या जमाती (ब) – ३७४
  • भटक्या जमाती (क) – ४७३
  • भटक्या जमाती (ड) – २९२
  • विमुक्त मागास प्रवर्ग – २९२
  • इतर मागास वर्ग – २९२६
  • इडब्लूएस – १५४४,
  • खुला – ५४६८ जागा
  • एकूण – १४९५६

कुठे किती जागा?

  • मुंबई – ६७४०
  • ठाणे शहर – ५२१
  • पुणे शहर – ७२०
  • पिंपरी चिंचवड – २१६
  • मिरा भाईंदर – ९८६
  • नागपूर शहर – ३०८
  • नवी मुंबई – २०४
  • अमरावती शहर – २०
  • सोलापूर शहर- ९८
  • लोहमार्ग मुंबई – ६२०
  • ठाणे ग्रामीण – ६८
  • रायगड – २७२
  • पालघर – २११
  • सिंधूदुर्ग – ९९
  • रत्नागिरी – १३१
  • नाशिक ग्रामीण – ४५४
  • अहमदनगर – १२९
  • धुळे – ४२
  • कोल्हापूर – २४
  • पुणे ग्रामीण – ५७९
  • सातारा – १४५
  • सोलापूर ग्रामीण – २६
  • औरंगाबाद ग्रामीण- ३९
  • नांदेड – १५५
  • परभणी – ७५
  • हिंगोली – २१
  • नागपूर ग्रामीण – १३२
  • भंडारा – ६१
  • चंद्रपूर – १९४
  • वर्धा – ९०
  • गडचिरोली – ३४८
  • गोंदिया – १७२
  • अमरावती ग्रामीण – १५६
  • अकोला – ३२७
  • बुलढाणा – ५१
  • यवतमाळ – २४४
  • लोहमार्ग पुणे – १२४
  • लोहमार्ग औरंगाबाद -१५४
Leave a comment