अनंत चतुर्दशीला महाराष्ट्रात मुसळधार..! राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

WhatsApp Group

Maharashtra Monsoon Update 2022 : महाराष्ट्रात गुरुवारी पाऊस पुन्हा एकदा लोकांच्या अडचणी वाढवणार आहे. हवामान केंद्रानं गुरुवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद इथं ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल. हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ इथं हलका आणि मुसळधार पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शिवाय वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यासाठी हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्यानं ११ सप्टेंबरपर्यंत अलर्ट जारी केला आहे. याआधी बुधवारीही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सुरूच होता. स्कायमेट वेदरच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागात चक्रीवादळ आणि कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे, ज्यामुळं मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडं, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘चांगल्या ते समाधानकारक’ श्रेणीत नोंदवला जात आहे. अनंत चतुर्दशीला नागरिकांची तारांबळ उडण्यचाी शक्यता आहे.

हेही वाचा – IPhone 14 आणि त्याच्या तीन भावांची घोषणा..! तिघांची किंमत महागडीचं; तरीही वाचा!

मुंबईचं आजचं हवामान

गुरुवारी मुंबईत कमाल तापमान ३१ आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ असेल आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘चांगल्या’ श्रेणीत ४४ वर नोंदवला गेला.

पुण्याचं आजचं हवामान

पुण्यात कमाल तापमान ३० आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आहे. ढगाळ वातावरण असेल आणि इथंही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत ९२ वर नोंदवला गेला आहे.

आज नागपूरचं हवामान

नागपुरात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि काही वेळ ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक ७८ आहे, जी ‘समाधानकारक’ श्रेणीत येते.

नाशिकचं आजचं हवामान

नाशिकमध्ये कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहू शकतं. अंशतः ढगाळ वातावरण असेल आणि मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत ६३ आहे.

औरंगाबादचं हवामान

औरंगाबादमध्ये कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. अंशतः ढगाळ वातावरण असेल आणि मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत ९२ असा आहे.

रायगडमधील पेणमध्ये पावसाचा हाहाकार झाला आहे. अनेक बाजारपेठांमध्ये पाणी साचलं असून दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरलं आहे. महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. हवामान विभागानं ७ ते ११ सप्टेंबर या दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment