लाच मागितली! आता काय करायचं? तक्रार कोणाकडे करू? जाणून घ्या!

WhatsApp Group

लाच घेणे हा लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 आणि आयपीसीच्या कलम 171 नुसार दंडनीय गुन्हा आहे. या कायद्यानुसार लाच घेण्यासोबत लाच देणेही गुन्हा आहे. 2022 मध्ये भ्रष्टाचार निर्देशांक (Corruption Perceptions Index) जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये भारत 40 गुणांसह 85 व्या स्थानावर होता. यावरून आपल्या देशात भ्रष्टाचारात गुंतलेल्या अधिकाऱ्यांची संख्या कमी नाही, हे स्पष्ट होते. अशा स्थितीत देशातील नागरिकांनी हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे की, त्यांना भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत असेल किंवा कोणत्याही अधिकाऱ्याने लाच मागितली तर त्याची तक्रार कुठे करायची. (Know How To Complaint Bribery In Marathi)

जर एखादा अधिकारी तुमच्याकडून कोणतेही अधिकृत काम करण्यासाठी बेकायदेशीरपणे पैसे घेत असेल तर ती लाचखोरी आहे आणि तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. त्याच बरोबर जर तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याला तुमच्याकडून कोणतेही काम करून देण्यासाठी पैसे दिले तर तो देखील गुन्हा आहे आणि त्यासाठी अधिकारी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात.

हेही वाचा – जगातील सर्वात महागडे 5 खाद्यपदार्थ, एका प्लेटची किंमत 29 लाख!

लाचखोरीची तक्रार कुठे करायची?

लाचखोरी किंवा भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्यासाठी प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या एजन्सी स्थापन करण्यात आल्या आहेत. विशेषत: तुम्हाला बहुतेक राज्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आढळेल, जिथे तुम्ही अशी तक्रार दाखल करू शकता. महाराष्ट्रात तु्म्हाला तक्रार दाखल करायची असेल तर खालील वेबसाईटवर जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

https://acbmaharashtra.gov.in/Complain

तुम्हाला तुमची तक्रार केंद्रीय दक्षता आयोगाकडे पाठवायची असल्यास, तुम्ही पत्र, कॉल आणि फॅक्सद्वारे करू शकता.

पूर्ण पत्ता – दक्षता भवन, ए-ब्लॉक GPO कॉम्प्लेक्स, INA नवी दिल्ली – 110 023.
या क्रमांकावर फोनद्वारे तक्रार करा – 011- 24600200. तुम्ही तुमची तक्रार 011- 24651010 किंवा 24651186 वर फॅक्स देखील करू शकता.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment