रेशनकार्डधारकांसाठी ‘गोड’ न्यूज..! दिवाळीला एका पाकिटात मिळणार ‘या’ गोष्टी; किंमत फक्त १०० रुपये!

WhatsApp Group

Diwali Package For Ration Card Holders : दिवाळीपूर्वी महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळात सरकारने रेशनकार्डधारकांना दिवाळीपूर्वी भेट दिली आहे. दिवाळीदरम्यान शिधापत्रिकाधारकांना रवा, तेल, साखर, हरभरा डाळ (प्रत्येकी एक किलो) स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. या चार वस्तूंचे एक पाकीट रेशन दुकानात केवळ शंभर रुपयांना मिळणार आहे. दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिधापत्रिकाधारकांना ही भेट दिली आहे. १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना याचा फायदा होईल.

दुसरीकडे, मंगळवारीच मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील लोकांसाठी ७०० आरोग्य दवाखाने उघडण्याची घोषणा केली आहे. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारचे हे ७०० आरोग्य दवाखाने उघडले जातील, ज्यांना आपला दावाखाना म्हटले जाईल. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करणे हे महाराष्ट्र सरकारचे प्राधान्य आहे. यासोबतच ग्रामीण भागातील लोकांना चांगले उपचार मिळावेत यासाठी शिंदे सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – Adipurush Controversy : ‘आदिपुरुष’मधील मराठी अभिनेत्याच्या लूकवर आक्षेप..! दिग्दर्शकाविरुद्ध कारवाई होणार?

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील इतर निर्णय

  • आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमणार.
  • पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार.
  • नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार. सुधारित खर्चास मान्यता.
  • भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार. योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता.
  • उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार. खर्चास सुधारित मान्यता. ८ दुष्काळी तालुक्यांना फायदा

५ ऑक्टोबर रोजी शिंदे गट आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. शिवसेनेच्या इतिहासात दसरा मेळाव्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने दोन्ही गटांसाठी हा मेळावाही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबईतील ऐतिहासिक मैदान असलेल्या शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा, तर वांद्रे कुर्ला संकुलात शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी दावा केला की, ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्याला लाखो लोक उपस्थित राहतील. दसरा मेळाव्यासाठी स्थळापेक्षा तत्त्वे महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेनेचा दसरा मेळावा आतापर्यंत फक्त मुंबईच्या शिवाजी पार्कमध्येच झाला आहे. शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटानेही परवानगी मागितली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव गटाला परवानगी दिली. यानंतर शिंदे गटाने वांद्रे कुर्ला संकुलात आपला मोर्चा काढला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment