ऑलिम्पिक मेडल जिंकून स्वप्नील कुसळे मालामाल, महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस!

WhatsApp Group

Swapnil Kusale : या ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली असून तिन्ही पदके नेमबाजीतील आहेत. पॅरिस ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने कांस्यपदक जिंकून भारताच्या तिसऱ्या पदकाची भर घातली. 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत त्याने हे पदक जिंकून इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल महाराष्ट्र सरकारने स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या नेमबाज स्वप्नीलने देशाची शान उंचावली आहे. खेळांच्या सहाव्या दिवशी भारताला त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती आणि त्याने देशवासीयांची निराशा केली नाही. स्वप्नीलच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला बक्षीस जाहीर केले. स्वप्नील भारतात परतल्यानंतर महाराष्ट्र सरकार त्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देणार आहे.

शिंदेंचा स्वप्नीलशी संवाद

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वप्नील कुसळेचे पदक जिंकल्यानंतर त्याच्या पालकांशी आणि प्रशिक्षकाशी बोललो. पदक जिंकल्याबद्दल व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले. एकनाथ शिंदे म्हणाले, “महाराष्ट्र सरकारने स्वप्नील कुसळेला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ऑलिम्पिकनंतर पॅरिसहून परतल्यावर त्याला हा पुरस्कार देण्यात येईल. कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावचा रहिवासी आहे.

हेही वाचा – तरुणांना मिळणार काम! रोजगाराच्या नवीन संधीसाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’

नेमबाज स्वप्नील कुसळे हा महाराष्ट्रासाठी कोणत्याही एकेरीत ऑलिम्पिक पदक जिंकणारा दुसरा खेळाडू आहे. खाशाबा जाधव यांनी 1952 च्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. आता 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलने 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment