Fire Breaks Out Near Hospital in Mumbai : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील घाटकोपर येथील पारेख हॉस्पिटलनजीक भीषण आग लागली आहे. हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. आगीचे लोळ दिसताच अग्निशमन दलाला तत्काळ माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही. प्रकरणाचा तपास सुरू आहे.
घाटकोपर परिसरात लागलेल्या आगीपासून आतापर्यंत २२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर सर्वांना रुग्णालयात पाठवण्यात आले. विश्वास इमारतीतील जुनो पिझ्झा हॉटेलच्या मीटर रुममधून आग पसरल्याचे वृत्त आहे.
#WATCH | Maharashtra: Fire breaks out near Parekh Hospital in Mumbai's Ghatkopar. Eight fire tenders have reached the spot. Further details awaited: Mumbai Fire Brigade pic.twitter.com/iiKUAIGEAh
— ANI (@ANI) December 17, 2022