“ट्रकनं कट मारला आणि…” नेमका कसा झाला विनायक मेटेंच्या कारचा अपघात?

WhatsApp Group

Vinayak Mete’s Road Accident : महाराष्ट्रातील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज रविवारी पहाटे (१४ ऑगस्ट) एक अपघात झाला. या अपघातात माजी आमदार विनायक मेटे यांचा मृत्यू झाला आहे. मेटे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. मराठी समाजाला आरक्षण देण्यासाठी झुंजणारा नेता म्हणून मेटेंची विशेष ओळख होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोपीनाथ मुंडे यांच्याशी मेटेंचे अतिशय जवळचे संबंध होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. यापूर्वी ते राष्ट्रवादीचे समर्थक होते. मराठा समाजासाठी झिजणारे नेते, अशी मेटेंची ओळख होती.

विनायक मेटे यांच्या गाडीत तिघे जण

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माडप बोगद्याजवळ ही घटना घडल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले. विनायक मेटे हे त्यांचा चालक एकनाथ कदम आणि एका बॉडीगार्डसह गाडीत होते. तिघेही पुण्या

कसा झाला अपघात?

बीडकडून मुंबईकडे जात असताना मेटेंच्या कारला अपघात झाला. एका ट्रकनं मेटेंच्या गाडीला कट मारला. गाडीच्या मागच्या सीटवर डाव्या बाजूला मेटे हे बसले होते. ड्रायव्हरच्या बाजूला त्यांचा बॉडीगार्ड होता. मेटेंची कार हायवेच्या मधल्या लेनमध्ये होती. दहा चाकी ट्रक हा तिसऱ्या लेनला चालत होता. या ट्रकनं तिसऱ्या लेनमधून मधल्या लेनमध्ये येणाचा प्रयत्न केला. यावेळी मेटे यांची गाडी वेगात होती. अचानक ट्रक मधे आल्यानं मेटेंची गाडी ट्रकला धडकली. चालकाला गाडीवर नियंत्रण आणता आलं नाही. अपघातावेळी मेटे झोपेत होते. अपघातानंतर ड्रायव्हरनं १०० नंबरला फोन केला, पण समोरून फोन उचलला नाही, मदतीसाठी ड्रायव्हर हायवेवरही झोपला, त्यानंतर एका गाडीवाल्यानं त्यांची मदत केली. तासाभरानंतर रुग्णवाहिका आली.

हेही वाचा – शेअर मार्केटचे ‘सचिन तेंडुलकर’ होते राकेश झुनझुनवाला! एका दिवसात छापले होते ९०० कोटी!

डॉक्टरांनी दिली ‘अशी’ माहिती

पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात मेटे यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं, की मेटेंना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणलं होतं. त्यांना सकाळी ६.२०च्या सुमारास आणण्यात आले. त्याची नाडी किंवा रक्तदाब थांबला होता. रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आम्ही ECG (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) देखील केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचे मेटे मराठा आरक्षणाचे समर्थक होते. त्यांचा जन्म ३० जून १९७० रोजी झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात विनायकराव मेटे यांचे नाव झपाट्यानं पुढं आलं होतं. स्वातंत्र्यलढा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ या दोन मोठ्या गोष्टींचा मेटेंच्या जीवनावर प्रभाव होता. विनायक मेटे २०१६ मध्ये भाजपच्या कोट्यातून बिनविरोध आमदार म्हणून निवडून आले होते. मेटे आज एका बैठकीला जाण्यासाठी मुंबईला निघाले होते. महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, मेटे यांच्या निधनानं त्यांना धक्का बसला आहे. पाटील म्हणाले, “”खरं तर ते मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडत होते. हे आमचं आणि मराठा समाजाचं मोठं नुकसान आहे.”

Leave a comment