Dasara Melava 2022 : एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी आज ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात दसरा मेळावा आयोजित केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दादरच्या शिवाजी पार्कवर आणि एकनाथ शिंदे गटाच्या बीकेसी मैदानावर सभा घेण्यास परवानगी मिळाली. रॅलीच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांनी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर एकनाथ शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा ठरला.
“हो गद्दारी झाली, पण…”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी तुम्हाला आणि भाजपला निवडून दिले, पण तुम्ही (उद्धव) काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी करून जनतेची फसवणूक केली, असे सांगितले. शिंदे म्हणाले, ”उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तालावर नाचत राहिले. आम्ही गद्दारी केली नाही. हो, गद्दारी झाली, पण ती २०१९ मध्ये झाली. महाविकास आघाडी (एमव्हीए) करून हा विश्वासघात झाला.
हेही वाचा – मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी!
#EknathShinde #Dasara2022 #DasaraMelava #दसरा_मेळावा #vachamarathi #दसरा #UddhavThackeray pic.twitter.com/wfbitQTB1J
— Vacha Marathi (@VachaMarathi) October 5, 2022
कोरोनात तुमची दुकाने सुरू होती – शिंदे
शिंदे म्हणाले, ”तुमचा कारभार कुणालाही आवडत नव्हता. कोविड कोविड करून तुम्ही सर्वांना घरात बसवले. दुकाने बंद केली, मंदिरं बंद केली, बाजारपेठा बंद केल्या, पण तुमची दुकानं सुरूच होती. कसली दुकाने सुरू होती हे मी बोलत नाही, पण चालू होती हे मला माहिती होते. माझ्याशिवाय जास्त कोणाला माहिती असणार आहे?”