“एक धुरंधर नेतृत्व…”, CM एकनाथ शिंदेंची मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली

WhatsApp Group

CM Eknath Shinde Pays Tribute To Late Mulayam Singh Yadav : समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते हरयाणातील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल होते. ”समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाने देशाच्या राजकारण, समाजकारणातील एक धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले”, अशा शब्दांत शोक व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“मुलायमसिंह यांची राजकीय कारकीर्द संघर्षशील आणि वैशिष्ट्यपूर्ण राहिली. पक्षाची स्थापना, संघटन बांधणी ते देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांनी आपला ठसा उमटवला. देशाच्या राजकारणात त्यांनी धुरंधर आणि मुत्सद्दी नेतृत्व म्हणून ओळख मिळवली. त्यांचे देशाच्या समाजकारण, राजकारणातील योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईल. ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

हेही वाचा – मुलायम सिंह यादव यांचं निधन..! अखिलेश म्हणाले, “माझे बाबा आता राहिले नाहीत”

नेताजी तीन वेळा यूपीचे मुख्यमंत्री

मुलायमसिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई गावात झाला. त्यांचे वडील साखरसिंह यादव हे शेतकरी होते. सध्या मुलायम सिंह मैनपुरी मतदारसंघातून लोकसभेचे खासदार होते. ते तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि देशाचे संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. मुलायमसिंह ८ वेळा आमदार आणि ७ वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत. मुलायमसिंह यादव यांनी दोन विवाह केले. त्यांची पहिली पत्नी मालती देवी यांचे मे २००३ मध्ये निधन झाले. मालती देवी या अखिलेश यादव यांच्या आई होत्या. मुलायम यांनी साधना गुप्ता यांच्याशी दुसरे लग्न केले. मुलायमसिंह आणि साधना यांच्या मुलाचे नाव प्रतीक यादव आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment