महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून PFI बंदीचं स्वागत; मानले अमित शाहंचे आभार!

WhatsApp Group

CM Eknath Shinde On PFI Ban : केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या ८ संलग्न संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घातली. एनआयएसह सर्व तपास यंत्रणांनी पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले. एनआयए, ईडी आणि राज्य पोलीस आणि एटीएसने २२ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबर रोजी देशभरातील पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. यावेळी सुमारे ३५० जणांना अटक करण्यात आली. छापेमारीत तपास यंत्रणांना पीएफआयविरोधात पुरेसे पुरावे मिळाले होते. त्याआधारे गृह मंत्रालयाने पीएफआयवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे.

हेही वाचा – PFI बॅन करण्यापूर्वी भारत सरकारनं ‘या’ ४२ संघटनाही बंद करून टाकल्यात..! वाचा यादी

पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. दहशतवादी कारवाया तसेच त्याला अर्थ पुरवठा करणे, भीषण हत्या, देशाच्या घटनात्मक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली होती. या संघटनेचा महाराष्ट्रातही घातपात घडविण्याच्या कट असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – “ती माझ्यासाठी देव आहे…” आईच्या निधनानंतर ‘महाराष्ट्राचा जावई’ महेश बाबूचा जुना VIDEO चर्चेत!

महाराष्ट्रातील पुण्यासारख्या महानगरात त्यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तो वेळीच हाणून पाडला. देशविघातक कृत्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचे मनसुबे राज्यात कधीच यशस्वी होणार नाही, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पीएफआय वरील बंदीचे पुन्हा एकदा स्वागत केले आहे.

Leave a comment