Rs 15,000 Bonus To Maharashtra Farmers : एकनाथ शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. २ हेक्टरपर्यंत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकार हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. त्यामुळे राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यासोबतच त्यांनी राज्याच्या आर्थिक सल्लागार समितीच्या स्थापनेचीही घोषणा केली. महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात ही परिषद महत्त्वाची भूमिका बजावेल, असे ते म्हणाले. या परिषदेचे अध्यक्ष टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन असतील.
विदर्भाच्या विकासाशिवाय राज्याचा संपूर्ण विकास शक्य नाही, असे विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केले. विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या अविकसित भागात प्रगती करण्यासाठी आपले सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. सभागृहातील चर्चेला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, विदर्भ मजबूत असेल तर राज्य मजबूत होईल. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती विदर्भाच्या प्रगतीशिवाय शक्य नाही.
याचा लाभ धान उत्पादक जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. हा बोनस ऑनलाईन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. धान खरेदीत कोणतीही अनियमितता झाल्याची तक्रार आलेली नाही. केंद्र शासनाने राज्याला 15 लाख मेट्रीक टन धान खरेदीस मंजूरी दिली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 29, 2022
हेही वाचा – UPSC Interview Questions : माणसाची अशी कोणती गोष्ट आहे, जी दरवर्षी वाढते?
नुकत्याच उद्घाटन झालेल्या नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्गाचे कौतुक करताना शिंदे म्हणाले की, हा १० जिल्ह्यातून जातो आणि १४ जिल्ह्यांना अप्रत्यक्षपणे जोडतो. हा मेगा कॉरिडॉर विदर्भातील गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर तसेच मराठवाड्यातील जालना आणि नांदेड या जिल्ह्यांतून जाणार असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, हा सुपर एक्सप्रेस वे आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशलाही जोडतो.
ते म्हणाले, ”राज्यात पहिल्यांदाच एवढा मोठा एक्स्प्रेस वे बनला आहे. मुंबई आणि नागपूर एकत्र आणण्याचे स्वप्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिले होते. एक्स्प्रेस वेच्या आजूबाजूला बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जमीन खरेदी केली असून ती विदर्भासाठी वरदान ठरणार आहे.”