Maharashtra Politics : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर मंत्रिपदांच्या वाटपावरून सुरू असलेली कोंडी आज शुक्रवारी (14 जुलै) संपली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन, छगन भुजबळ यांना अन्न नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील यांना सहकारमंत्री आणि हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खाते मिळाले आहे. याशिवाय धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास, संजय बनसोडे क्रीडा व युवा मंत्रालय आणि धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अनिल पाटील यांच्याकडे पुनर्वसन मदत आपत्ती व्यवस्थापन विभाग सोपविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री शिंदेंकडे कोणते खाते आहेत?
शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, परिवहन विभाग, सामाजिक न्याय, हवामान बदल आणि खाण खात्याची जबाबदारी आहे. याशिवाय ते माहिती आणि तंत्रज्ञानासह माहिती आणि जनसंपर्क मंत्रालयही सांभाळत आहेत.
Portfolio allocation | Maharashtra's newly inducted Deputy CM Ajit Pawar gets Finance and Planning department
Cabinet Minister Chhagan Bhujbal gets food and civil supplies pic.twitter.com/V2xwdz1XKu
— ANI (@ANI) July 14, 2023
हेही वाचा – Chandrayaan-3 Launch : 1972 पासून कोणताही माणूस चंद्रावर का गेला नाही? वाचा कारण!
फडणवीसांकडे कोणत्या खात्यांची जबाबदारी?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय विभागाची जबाबदारी आहे. याशिवाय फडणवीस यांच्याकडे जलसंपदा, लाभक्षेत्र विकास ऊर्जा खातेही आहे. शिंदे गटाकडून अजित पवार गटाच्या खात्यात तीन मंत्रीपदे गेली आहेत.
Maharashtra Cabinet Portfolio Allocation @AjitPawarSpeaks led #NCP is a major gainer while CM @mieknathshinde led ShivSena is a big loser @BJP4Maharashtra found @AjitPawarSpeaks a best bet so they did not mind giving some crucial departments to his group pic.twitter.com/iLOw7mhjjk
— Sanjay Jog (@SanjayJog7) July 14, 2023
राष्ट्रवादीत बंडखोरी
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 जुलै रोजी फूट पडली. त्यांचे पुतणे अजित पवार आणि सुमारे तीन डझन आमदार सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीमध्ये सामील झाले. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!