12th Paper Leak : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी १२वीचा पेपर फुटला..! सोशल मीडियावर व्हायरल झाली प्रश्नपत्रिका

WhatsApp Group

Maharashtra Board HSC 12th Paper Leak : महाराष्ट्र बोर्डाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्राचा पेपर शुक्रवारी लीक झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथून बारावीचा पेपर फुटला आहे. महाराष्ट्र बारावीचा सकाळच्या शिफ्टचा पेपर सकाळी ११ वाजता सुरू होणार होता पण परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या ३० मिनिटांपूर्वी हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला.

वास्तविक, महाराष्ट्र १२वी बोर्डाच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून त्या २० मार्चपर्यंत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतल्या जातील. पहिली शिफ्ट सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

गणित आणि सांख्यिकी (A/S), गणित आणि सांख्यिकी (C) परीक्षा ३ मार्च रोजी सकाळच्या शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. विद्यार्थी नेमलेल्या परीक्षा केंद्रावर पोहोचले पण परीक्षा सुरू होण्यापूर्वीच बारावीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Maharashtra Board HSC 12th Paper Leak question paper went viral on social media

हेही वाचा – Scheme : शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरतेय ‘ही’ योजना..! एका वर्षात मिळतात ‘इतके’ पैसे

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील परीक्षा केंद्रातून पेपर फुटला आहे. सध्या शिक्षणाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

पेपरफुटीनंतर विधानसभेत गदारोळ

विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांनी पेपरफुटीप्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की हे सरकार झोपले आहे का? परीक्षेपूर्वी पेपर फुटतो. पेपरसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय? महाराष्ट्र सरकारने यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment