Maharashtra Board 10th Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवार, 2 जून 2023 रोजी इयत्ता 10वीचा म्हणजेच महाराष्ट्र SSC चा निकाल जाहीर केला. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज 2 जूनला जाहीर झाला. निकालाची लिंक दुपारी 1 वाजता सक्रिय केली जाईल. महाराष्ट्र बोर्डातून दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वरून बोर्ड परीक्षेचा निकाल पाहू शकतात. एसएससीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव वापरावे लागेल. या बोर्डाच्या परीक्षेत 93.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 95.87% मुली आणि 92.05% मुले आहेत.
15 लाख मुलांनी दिली परीक्षा
महाराष्ट्र मंडळातर्फे 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली. राज्यातील 5033 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 15,77,256 उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 3,54,493 एकट्या मुंबई विभागातील होते. महाराष्ट्रात 8,44,116 मुले आणि 7,33,067 मुलींनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
Maharashtra Board SSC Class 10th results declared. The state recorded a pass percentage of 93.83% —- 95.87% of girls and 92.05% of boys passed.
— ANI (@ANI) June 2, 2023
हेही वाचा – महेंद्रसिंह धोनीच्या हातात भगवद्गीता, फोटो होतोय व्हायरल!
SMS द्वारे कसे तपासायचा निकाल?
विद्यार्थी महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 ऑनलाइन तसेच एसएमएसद्वारे पाहू शकतात. एसएमएसद्वारे तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना MHSSC (स्पेस) सीट नंबर फॉरमॅटमध्ये एक संदेश टाईप करावा लागेल आणि तो 57766 वर पाठवावा लागेल.
SSC Maharashtra Board Result 2023 | दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९३.८६% | zee24taas#sscboard #10thresult #maharashtraboard #exam #msbseresults #sscresult2023 pic.twitter.com/g7oWSNSsCs
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 2, 2023
निकाल कसा तपासायचा?
- सर्वप्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
- त्यानंतर मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा.
- आता विद्यार्थ्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल.
- त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
- असे केल्याने महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 10वीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- आता विद्यार्थी महाराष्ट्र एसएससी परीक्षेचा निकाल डाउनलोड करू शकतात आणि त्याची प्रिंट काढू शकतात.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!