Maharashtra BJP MLA Accident : महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये जयकुमार गोरे यांच्यासह ४ जण जखमी झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातील आमदार गोरे यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. याशिवाय अन्य लोकांवर अन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये आमदाराचे दोन रक्षक आणि एका चालकाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
वृत्तानुसार, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटणजवळ शनिवारी सकाळी आमदार जयकुमार गोरे यांची गाडी पुलावरून खाली पडली. ज्याची खोली सुमारे ३० फूट सांगितली जात आहे. या गाडीत गोरे यांच्याशिवाय त्यांचा गार्ड, ड्रायव्हर आणि आणखी एक जण असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा – Mahindra Thar आता स्वस्तात मिळणार..! कंपनी आणतंय नवीन मॉडेल; जाणून घ्या किंमत!
Maharashtra | BJP MLA Jaykumar Gore met with an accident on the Pune-Pandharpur road in Satara district near Malthan last night
He is admitted to a Pune hospital along with his driver and two guards pic.twitter.com/jn9Xu5Ftrr
— ANI (@ANI) December 24, 2022
अपघाताबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “शनिवारी सकाळी हा अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे कार लोणंद-फलटण रस्त्यावरील पुलावरून सुमारे ३० फूट खाली पडल्याची शक्यता आहे. आमदार गोरे आणि अन्य तिघे अपघातात जखमी झाले. गोरे यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले, तर इतर जखमींवर अन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.” गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
बाणगंगा नदीजवळ जखमींना वाचवणारे आणि बाहेर काढणारे ग्रामस्थ सांगतात की कार खोल दरीत पडली होती आणि लोक त्यांचे प्राण वाचवण्यासाठी मदतीची याचना करत होते. गावकऱ्याने सांगितले की आमदाराचा गार्ड मदतीची याचना करत होता आणि म्हणत होता की आमदाराच्या गाडीला अपघात झाला आहे. जवळच्या पोलीस स्टेशनला फोन केला. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावले आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.