रत्नागिरीत नर्सिंग विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रात चाललंय काय?

WhatsApp Group

Ratnagiri : कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या लैंगिक अत्याचार-हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील रत्नागिरीत नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. येथे एका ऑटो चालकाने पीडितेला अंमली पदार्थ मिसळून बेशुद्ध केले आणि जंगलात नेल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना सोमवारी (26 ऑगस्ट) घडली.

पीडित तरुणी 19 वर्षांची आहे. शुद्धीवर आल्यानंतर तिने बहिणीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीत लोकांनी निदर्शने सुरू केली. एसपी जयश्री गायकवाड यांनी रुग्णालयात पीडितेकडून घटनेची माहिती घेत गुन्हा दाखल केला. ऑटो चालकाची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. सोशल मीडियावर ऑटोचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

हेही वाचा – VIDEO : सचिन तेंडुलकर आता ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांचा ब्रँड अॅम्बेसेडर!

नर्सिंगच्या विद्यार्थिनीने सांगितले की, “रविवार (25 ऑगस्ट) सुट्टीचा दिवस होता. मी देवरूख येथील माझ्या घरी गेले होते. नेहमीप्रमाणे सोमवारी (26 ऑगस्ट) सकाळी 6 च्या बसने देवरूखहून रत्नागिरीला पोहोचले. सकाळी 7 च्या सुमारास मी रत्नागिरीच्या साळवी स्टॉपला पोहोचली.

कॉलेजला जाण्यासाठी रिक्षा घेतली. वाटेत ऑटो चालकाने मला पाणी दिले, जे पिऊन मी बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्यावर माझे सर्व सामान जंगलात विखुरलेले दिसले. कपडे फाटले होते. माझ्या बहिणीला फोन करून घटनेची माहिती दिली.

पीडितेने पोलिसांना सांगितले की, घटनेनंतर ती कशीतरी मुख्य रस्त्यावर पोहोचली. तेथे दुचाकीस्वाराची मदत घेत ती तिच्या फ्लॅटवर पोहोचली, तेथून तिला रुग्णालयात नेण्यात आले.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment