आम्हाला सांगताना लाज वाटतेय, छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला!

WhatsApp Group

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा दुर्दैवाने कोसळला आहे. यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडले होते.

”शिवाची महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला. याबद्दल आम्हाला दु:ख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. 6 महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून हा पुतळा उभारण्यात आला. ज्यावेळी काम सुरू होते त्यावेळी स्थानिक लोकांनी सुद्धा कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. पण त्यावेळी पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले. जे विरोध करत आहे करत आहेत ते आपल्या विरोधात आहे असा समज करुन घेतला. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण 6 महिन्यांपूर्वी येथील कम ढासळले. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल. तसेच सर्व शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावे”, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.

हेही वाचा – Unified Pension Scheme : पेन्शन की टेन्शन? लोकांचा UPS ला विरोध का?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची जमिनीपासून उंची सुमारे 43 फूट एवढी होती. बांधकाम जमिनीपासून 15 फूट तर त्यावर 28 फूट उंच अशी या पुतळ्याची रचना आहे. नौसनेकडून हा पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याची किंमत 2 कोटी 40 लाख 71 हजार एवढी रुपये एवढी आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment