शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट? १२ नेत्यांनी पक्ष सोडल्याचा शहाजीबापू पाटलांचा दावा!

WhatsApp Group

Shahaji Bapu Patil On 12 Leaders leaving NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना न्यूमोनिया झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या १२ नेत्यांनी त्यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र म्हटल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. या फुटीची सुरुवात सोलापुरातून होईल, असा गौप्यस्फोट शहाजीबापू पाटील यांनी केला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारबाबत अशीच विधाने केली होती. या दोन दिवसांनी शिंदे सरकार पडणार असल्याचे जयंत पाटील यांनी शिर्डीत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय विचारमंथन शिबिरात सांगितले. शिर्डीत झालेल्या काँग्रेसच्या शेवटच्या अधिवेशनानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले होते.

हेही वाचा – शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्याचा प्रयत्न करणार – देवेंद्र फडणवीस

शहाजीबापू पाटील म्हणाले की, सरकार पडण्याची भीती अनेकवेळा दाखवण्यात आली आहे. १९९५ सालची गोष्ट आहे. तेव्हा ५ वर्षे शरद पवार पुढच्या महिन्यात सरकार पडेल, आता पडेल, मग पडेल, असे सांगत राहिले. पण मनोहर जोशी आणि नारायण राणे यांचे सरकार पडले नाही. आताही हे घडत आहे. शिंदे-भाजप सरकार पडण्याची भीती दाखवून त्यांचे नेते बळजबरीचे वातावरण निर्माण करत आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment