

Farewell To Governor Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे गुरुवारी (दि. १६) राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला.
हेही वाचा – तुम्हीही विसरून जाल Activa..! होंडाने आणली ‘नवी’ स्कूटर; वाचा किंमत आणि कारसारखे फीचर्स!
राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला.शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी राज्यपाल कोश्यारी यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर ते देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत.