LPG Price : नवरात्रीच्या मध्यावर एक दिलासा देणारी बातमी आली आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) नुसार, १ ऑक्टोबरपासून दिल्लीमध्ये इंडेनच्या १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत २५.५ रुपये, कोलकाता ३६.५ रुपये, मुंबई ३२.५ रुपये, चेन्नईमध्ये ३५.५ रुपयांनी कमी झाला आहे. मात्र, घरगुती वापरासाठी वापरल्या जाणार्या सिलिंडरच्या किमती कायम आहेत. १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या किमतीतच उपलब्ध असेल.
चार महानगरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या नवीन किमती
दिल्लीत इंडेनचा १९ किलोचा सिलिंडर आता १८८५ रुपयांऐवजी १८५९.५ रुपयांना मिळणार आहे. तर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर १९९५.५० रुपयांना मिळणार आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडर १८४४ रुपयांऐवजी १८११.५ रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडर २००९.५ रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी हा सिलिंडर २०४५ रुपयांना मिळत होता.
हेही वाचा – 4G पेक्षा 5G कसं असेल? किती फास्ट असेल? किती किंमत असेल? इथं वाचा!
The price of a commercial LPG cylinder in Delhi reduced by Rs 25.5 with effect from today
— ANI (@ANI) October 1, 2022
सहा महिन्यांपासून दरात सातत्याने घट
सलग सहाव्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. मे महिन्यात त्याची किंमत २३५४ रुपयांवर पोहोचली होती, मात्र त्यानंतर सातत्याने कपात केली जात आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात झाल्याने बाहेरचे खाणे-पिणे स्वस्त होण्याची शक्यता आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांमध्ये याचा वापर केला जातो. मात्र इतर वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ते कमी अपेक्षित धरले जात आहे.
नैसर्गिक वायूची दरवाढ
नैसर्गिक वायूच्या किमती ४० टक्क्यांनी वाढून विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. आता पाईपद्वारे स्वयंपाकघरात पोहोचणाऱ्या सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमती वाढू शकतात. ONGC आणि OIL च्या जुन्या फील्डमधील गॅसची किंमत US$ ६.१ वरून US$ ८.५७ प्रति mmBtu पर्यंत वाढली आहे. PPAC आदेशात म्हटले आहे की रिलायन्स-बीपीचे गॅसचे दर US$ १२.४६ पर्यंत वाढले आहेत.