महाराष्ट्रात एनडीएला मनसेचा पाठिंबा, राज ठाकरेंची ‘मोठी’ घोषणा!

WhatsApp Group

Loksabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माझा पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बिनशर्त पाठिंबा देईल, अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली. यासोबतच लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे मनसे प्रमुखांनी सांगितले. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या जाहीर सभेला ठाकरे बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतरच राज ठाकरे भाजपसोबत युती करतील, अशी अपेक्षा होती आणि आता मनसे प्रमुखांनी अधिकृतपणे त्यांचा पक्ष एनडीएशी युती करणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रात महायुतीला पाठिंबा जाहीर करण्यासोबतच त्यांनी कार्यकर्त्यांना आता थेट विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले.

हेही वाचा – OMG…ऋषभ पंतबाबत सर्वात ‘मोठी’ बातमी!

दिल्लीत अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांबाबत ते म्हणाले, “अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसेची भाजपसोबत युती होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली. हे मीडियावाल्यांना हव्या त्या बातम्या दाखवत होते, पण त्या बैठकीत अमित शाह आणि मी दोघेच होतो, मग आमच्यात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे मीडियाला कसे कळणार?”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment