Gunaratna Sadavarte | लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाही सोलापूर मतदार संघासाठी भाजपकडे अजून उमेदवार ठरताना दिसत नाहीये. स्थानिक गटबाजीमुळे उमेदवार ठरवताना भाजपच्या वरिष्ठांची दमछाक होताना दिसत आहे. दिवसेंदिवस भाजपकडून नवनवीन नावाच्या चर्चेमुळे निवडणुकीत रंगात येत आहे. सोलापुरात असणारा तेलुगू भाषिकांचा प्रभाव पाहता आक्रमक चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्या नावाचा विचार पक्षश्रेष्ठी करत आहेत, अशी चर्चा आहे.
नुकत्याच झालेल्या एसटी महामंडळाच्या निवडणुकीत संपूर्ण पॅनल विजयी करून सदावर्ते यांनी निवडणुकीतील आपली व्यवस्थापनाची चुणूक दाखवून दिली. प्रसंगी सदावर्ते यांचे अनेक कार्यकर्ते देखील सोलापूरच्या राजकारणात सक्रिय असल्याचे बोलले जाते. सदावर्ते हे मूळ तेलुगू भाषिक असल्याने तेलुगू मतदारांवर ते प्रभावी ठरतील, असे पक्षाच्या वरिष्ठांना वाटत असल्याचे समजते.
हेही वाचा – IND Vs ENG : शुबमन गिलने पकडला ‘कपिल देव स्टाइल’ अद्भूत कॅच..! पाहा Video
एकदा मराठा, एकदा कन्नड आणि आता तेलुगू असा प्रयोग भाजपा करू पाहत असल्याचे वृत्त आहे. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर पुढील विधानसभा आणि महानगर पालिकेतील निवडणुकीत देखील भाजपाला याचा फायदा होऊ शकतो. शिवाय सदावर्ते यांनी अनेकवेळा फडणवीसांचे कौतुकही केले आहे. त्यामुळे आता सदावर्ते यांची लॉटरी लागते, का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!