मद्यप्रेमींसाठी महत्वाची अपडेट, मुंबईत सलग 3 दिवस दारुची दुकाने बंद

WhatsApp Group

Mumbai : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. देशभरात आतापर्यंत चार टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सोमवार 20 मे रोजी पाचव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा जागांवर मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तीन दिवस दारूची दुकाने बंद राहणार आहेत.

20 मे रोजी मुंबईतील सहाही जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात उत्तर मुंबई मतदारसंघ, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघ, ईशान्य मुंबई मतदारसंघ, उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ, दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आणि दक्षिण मुंबई मतदारसंघ या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईतील दारूची दुकाने आणि बार तीन दिवस बंद राहणार आहेत.

18 ते 20 मे या कालावधीत मुंबई आणि परिसरातील सर्व दारूची दुकाने आणि आस्थापने बंद राहतील. मुंबई शहरातील दारूची दुकाने आणि बार 18 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता बंद होतील. त्यानंतर 19 मे रोजी ही दुकाने दिवसभर बंद राहणार आहेत. त्यामुळे ही दुकाने 20 मे रोजी सायंकाळी 5 वाजता पुन्हा सुरू होतील. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा आदेश जारी केला आहे.

मुंबईतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने 18 ते 20 मे हा ड्राय डे जाहीर केला आहे. या काळात तळीरामांनी अप्रत्यक्षपणे मतदान प्रक्रियेत सहभाग घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment