मुकेश अंबानींच्या कंपनीवर LIC चा सट्टा! खरेदी केला मोठा हिस्सा, जाणून घ्या!

WhatsApp Group

LIC In Jio Financial Services : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) मुकेश अंबानींसोबत मोठा करार केला आहे. एलआयसीने Jio Financial Services (JFSL) मधील 6.66 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (LIC) सांगितले की, त्यांना हा हिस्सा डी-मर्जर प्रक्रियेद्वारे मिळाला आहे. एलआयसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजपासून वेगळे झालेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 6.66 टक्के शेअरहोल्डिंग मिळवले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजपासून जिओ फायनान्शिअलच्या विलगीकरणाचा (डी-मर्जर) फायदा विमा कंपनीला मिळाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या या विलिनीकरणापूर्वी एलआयसीला हा स्टेक 4.68 टक्के खर्चाच्या बरोबरीने मिळाला आहे. 30 जून 2023 पर्यंत, LIC ची रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 6.49 टक्के भागीदारी होती.

हेही वाचा – सचिन तेंडुलकरबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, जाणून घ्या!

मुकेश अंबानी यांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये स्टेक घेतल्याच्या बातमीचा परिणाम 4.20 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅप असलेल्या एलआयसी शेअर्सवरही दिसून आला. कंपनीने हा करार जाहीर केल्यानंतर लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा शेअर एक टक्क्यांहून अधिक चढला. दुपारी 2 वाजता एलआयसीचा शेअर 1.74 टक्क्यांच्या वाढीसह 663.50 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. सकाळी 9.15 वाजता एलआयसीचा शेअर 653.80 रुपयांवर उघडला आणि 667 रुपयांच्या उच्चांकावर गेला.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची विभक्त वित्तीय सेवा कंपनी, जिओ फिनच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, प्रोमोटर ग्रुप म्हणजेच अंबानी कुटुंबाचा कंपनीमध्ये 46 टक्के हिस्सा आहे आणि एलआयसी कंपनीच्या प्रमुख भागधारकांपैकी एक आहे. 20 जुलै रोजी झालेल्या डी-मर्जरनंतर, Jio Financial Services (नवीन नाव) चे स्टॉक व्हॅल्यू प्रति शेअर 261.85 रुपये निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे, डी-मर्जरनंतर रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंटचे नाव बदलून जिओ फायनान्शियल करण्यात आले आहे. या डी-मर्जर अंतर्गत, RIL च्या एका शेअरसाठी Jio Financial चा 1 अतिरिक्त हिस्सा देण्यात आला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment