

युवा परिवर्तन आणि बेकबेस्ट यांच्या सहयोगाने खोपोली येथील वडवली गावात पर्यावरणविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळेस 395 विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक बॉटलचा पुर्नवापर, कापड आणि पेपरच्या पिशव्या कशा वापराव्यात, सीड बॉल्स कसे बनवावेत आणि ओला, सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. युवा परिवर्तनच्या स्वयंसेवकांनी कचऱ्यातील प्लास्टिक बॉटलमध्ये गांडूळ खत टाकून रोपटे कसे लावावे हे विद्यार्थ्यांना शिकवले.

विद्यार्थ्यांना बाटलीत गांडूळखत टाकून ऑक्सिजन पूरक रोपटी लावली. प्लॅस्टिकच्या पिशव्या या पर्यावरणास अतिशय हानिकारक असतात. यावेळेस स्वयंसेवकांनी प्लॅस्टिकऐवजी पेपर आणि कापडाच्या पिशव्यांचा कसा वापर करावा याचीही माहिती दिली. अनेकदा शेतकऱ्यांकडे उन्हाळ्यात शेतात लावायला बियाणे नसतात. अशा वेळेस सीड बॉल्स आधीपासून तयार करून ठेवल्यास वेळप्रसंगी त्याचा उपयोग करता येतो. युवा परिवर्तनच्या स्वयंसेवकांनी शेण, माती आणि गांडूळखत याचा उपयोग करून सीडबॉल कसे बनवावेत याचेही प्रशिक्षण दिले. हे सीड बॉल्स नंतर शेतात कसे लावावेत याबद्दलही विद्यार्थ्यांना माहिती दिली.
हेही वाचा – Medicine Packaging : औषधे, गोळ्यांचे पॅकेट अॅल्युमिनियम फॉइलचे का असते?

आपल्या घरात रोज अनेक टन कचरा तयार होतो. कचऱ्याचे ओला आणि सुका अशी वर्गवारी करून त्यापासून कंपोस्ट खत कसे बनवावे याचेही त्यांनी प्रशिक्षण दिले. ‘वडवली येथे आयोजित केलेल्या पर्यावरणविषयक शिबीरास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबीरात विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये रोपे कशी लावावी, कचऱ्यांचे वर्गीकरण कसे करावे, या गोष्टी शिकवल्या. खोपोलीतील अजून 18 गावांमध्ये असे पर्यावरणविषयक शिबीर घेणार असल्याचे युवा परिवर्तनचे कार्यकर्ते भगवान कोंडर यांनी सांगितले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!