Launch Of Maha Nondani App : अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन लि. जिल्हा मार्केटींग कार्यालयाच्यावतीने धान खरेदीसाठी घर बसल्या मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करण्यासाठी ‘महानोंदणी’ या मोबाईल ॲपचा शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आला.
उपस्थित शेतकऱ्यांच्या नोंदणीने या ॲपचा शुभारंभ केल्यानंतर शेतकऱ्यांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी या ॲपचा शुभारंभ करण्यात आल्याचे सांगून, पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, अधिकाऱ्यांनी आपली क्षमता वाढवावी आणि ४३१ ग्रामपंचायतीय, ७४२ महसूल गावामध्ये १०० टक्के यावर नोंदणी पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी वाढवावी.
हेही वाचा – शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट? १२ नेत्यांनी पक्ष सोडल्याचा शहाजीबापू पाटलांचा दावा!
धान खरेदीसाठी घर बसल्या ‘महानोंदणी’ मोबाईल ॲपचा शुभारंभ! pic.twitter.com/QDfUb2XSVo
— Ravindra Chavan (@DombivlikarRavi) November 5, 2022
यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उदयोग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपस्थित होते. जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले.