लाडकी बहीण योजना बंद? महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी आलं ‘मोठं’ अपडेट!

WhatsApp Group

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण योजने’बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारची मुख्य योजना असून आचारसंहिता लागू झाल्यापासून ती चर्चेत आहे. या योजनेत 2.34 कोटी लाभार्थी आहेत, ज्यांना पाच महिने सतत 1500 रुपये मिळत आहेत.

यावर्षी (2024) सर्व पात्र महिलांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत 7500 रुपये मिळाले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर या योजनेत कोणताही नवीन लाभार्थी जोडता येणार नाही. अद्याप कोणतेही पेमेंट करायचे असल्यास, ते फक्त भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) पूर्व परवानगीने केले जाऊ शकते.

हेही वाचा – हे तुम्हाला माहितीये? दुबईत पायी चालणाऱ्यांनाही भरावा लागतो दंड, कारण ऐकाल तर…

या योजनेबाबत महाराष्ट्र सरकारकडून स्पष्टता आली आहे, कारण काही अहवालांमध्ये ही योजना महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बंद केल्याचे सांगण्यात आले होते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या योजनेचा शेवटचा हप्ता 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान वितरित करण्यात आला होता. राज्य सरकारने नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच वितरित केला होता. म्हणजेच प्रत्येक लाभार्थ्याला या महिन्यात 3000 रुपये मिळाले. निवडणुकीनंतर पुढील हप्ता डिसेंबरमध्ये द्यायचा आहे.

एका पोस्टनंतर चर्चा

शिवसेनेच्या यूबीटी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, होते की लाडकी बहीण योजना निवडणूक आयोगाने बंद केली आहे. बरं, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी आणि वितरणाबाबतची माहिती फेसबुकवर पोस्ट केली होती. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे सांगितले होते.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment