मुंबईमध्ये भर रस्त्यात कोरियन मुलीचा विनयभंग…! देशाला लाजवेल असा Video व्हायरल

WhatsApp Group

Korean Youtuber Harassed In Mumbai : देशाला लाजवेल अशी घटना मुंबईतून समोर आली आहे. कोरियाहून मुंबईत आलेल्या एका व्लॉगरचा विनयभंग करण्यात आला. ही तरुणी YouTuber आहे. मुंबईतील एका रस्त्यावर व्हिडिओ बनवत होती, त्यादरम्यान काही तरुणांनी तिचा विनयभंग केला. या कृत्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही महिला दक्षिण कोरियाची नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची दखल घेत तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. हे प्रकरण मीडियात आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि आरोपी तरुणांचा शोध सुरू केला. आरोपी तरुणांना गुरुवारी अटक करण्यात आली.

व्हिडिओ शेअर करणार्‍या ट्विटर अकाउंटने दावा केला आहे की पीडित महिला दक्षिण कोरियाची नागरिक आहे. रात्री आठच्या सुमारास ही मुलगी खार उपनगरात लाइव्ह करत होती. याच दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, मोबीन चांद मोहम्मद शेख (१९) आणि मोहम्मद नकीब सदरियालम अन्सारी (२०) अशी आरोपींची नावे आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खार पोलिसांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपी तरुणांना अटक केली.

हेही वाचा – Horoscope Today : मेषसह ‘या’ राशीच्या लोकांची होणार करिअरमध्ये प्रगती..! वाचा आजचं राशीभविष्य

व्हिडिओमध्ये काय आहे?

युवक महिलेच्या अगदी जवळ आला आणि तिने प्रतिकार केला तरीही तिचा हात धरून तिला ओढण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ती महिला घटनास्थळावरून निघून जाऊ लागली, तोच माणूस पुन्हा मित्रासोबत मोटारसायकलवर दिसला आणि त्याने त्या महिलेला तिच्या गंतव्यस्थानावर सोडण्याची ऑफर दिली, तर महिलेने तुटक्या इंग्रजीत त्याची ऑफर नाकारली.

एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत कोणीही पोलिसांकडे तक्रार केलेली नाही, परंतु तपास सुरू झाला असून पोलीस महिलेला त्रास देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment