जाळ अन धूर संगटच..! गणपतीच्या विसर्जनात पोलिसांचा ‘बेभान’ डान्स; पाहा VIDEO

WhatsApp Group

Police Dance in Ganesh Visarjan 2022 : महाराष्ट्रात पूर्ण दोन वर्षांनी गणपती उत्सवाचा जल्लोष झाला. १० दिवसांच्या उत्सवानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. बाप्पाला निरोप देण्यासाठी कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्वांनी बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येवो अशी प्रार्थना केली. त्याचवेळी कोल्हापूर पोलिसांनीही गणपती विसर्जनावर जल्लोष केला. पोलिसांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दुसरीकडे, कोल्हापूर महापालिकेच्या माहितीनुसार दुपारपर्यंत शंभरहून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

पुणे पोलिसांचाही व्हिडिओ

कोल्हापूरच्या व्हायरल व्हिडिओनंतर आता पुणे पोलिसांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पोलीस थकवा, ताण संगळं काही विसरून डान्स करताना दिसत आहेत. हा बेधुंद डान्सचा व्हिडिओ विसर्जन मिरवणूक संपल्यानंतरचा असल्याचं सांगण्यात आलं आहे. कर्तव्य बजावलंच आणि सणही साजार झाला, अशी चर्चा पोलिसांच्या या भन्नाट डान्सवरून करण्यात आली. पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूकांची जुनी परंपरा आहे. यावेळीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर लोकांना माहिती देण्यासाठी लाऊड ​​स्पीकरही लावण्यात आले होते, जेणेकरून विसर्जन पाहणाऱ्यांना त्याची संपूर्ण माहिती मिळावी.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

तिसरा व्हिडिओ नाशिकहून सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचा एका छोट्या मुलीसोबत सोबत ठेका धरला त्यांचा व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहे. इतर सणांसोबत गणेशोत्सवातही पोलीस संपूर्ण दिवस आपलं कर्तव्य बजावत असतात. या काळात त्यांना अनेकदा स्वतःसाठीही वेळ मिळत नाही.

हेही वाचा – 

VIDEO : नंदुरबारमध्ये ५० प्रवाशांसह बस उलटली; ड्रायव्हरसह १८ महिन्यांची चिमुरडी ठार!

‘बाहुबली’ फेम प्रभासवर दु:खाचा डोंगर..! कुटुंबातील दिग्गज अभिनेत्याचं निधन

बाप रे बाप..! हेअर ड्रायरमधून आग निघताच आख्खं सलून पेटलं; पाहा शॉकिंग VIDEO!

Leave a comment