Pune Chandani Chauk Bridge : ६०० किलो स्फोटकं वापरूनही पूल अर्धवट का पडला? अधिकारी म्हणाले, “कारण…”

WhatsApp Group

Pune Chandani Chauk Bridge : सर्वांची उत्सुकता लागून राहिलेला पुण्यातील चांदणी चौकाचा पूल मध्यरात्री ठीक १ वाजून ७ मिनिटांनी पाडण्यात आला. पुलाच्या स्ट्रक्चरला १३०० छिद्र पाडून त्यात ६०० किलो स्फोटक भरण्यात आली. या घटनेसाठी वाहतूकही थांबवली होती. या पुलामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती, त्यामुळेच तो पाडण्याचा निर्णय सरकारने घेतला. रात्री बारानंतर हा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता.

वृत्तानुसार, मुंबईस्थित कंपनी एडिफिस कंपनीला हा पूल पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, ज्याने नोएडातील ट्विन टॉवर्स देखील पाडले. मात्र, हा पूल अजूनही पूर्णपणे कोसळलेला नाही. अवघ्या ५ सेकंदाच्या स्फोटात पुलाचा अर्धा भागच कोसळू शकला. दरम्यान, पोकलेनच्या सहाय्याने स्फोट झाल्यानंतर पुलाचा उर्वरित भाग पाडण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा – Gandhi Jayanti : गांधी जयंतीच्या निमित्तानं ‘या’ शहरात मांसविक्रीला बंदी..!

पुलाच्या संरचनेचा काही भाग पूर्णपणे कोसळला नाही का, असे विचारले असता, एडिफिसच्या एका प्रमुख अभियंत्याने सांगितले, की स्फोटामुळे काँक्रीट काढून टाकले गेले आहे आणि आता फक्त स्टीलचे बार उरले आहेत. “एकदा मशीन वापरून स्टीलचे बार काढले की, बाकीची रचनाही पडेल. ज्यावेळी हा पूल बांधण्यात आला त्यावेळी मोठ्या प्रमाणावर स्टीलचा वापर केला गेला. आम्हाला त्या स्टीलचा अंदाज आला नाही. त्यामुळे स्फोटानंतर पुलाचा काही भाग शिल्लक राहिला.” पुण्यातील चांदणी चौक पुलावरील स्फोट यशस्वी झाल्याची पुष्टी एडिफिस इंजिनीअरिंगने केली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment