Monsoon : महाराष्ट्रात मान्सून केव्हा येणार? मुंबईत आगमन कधी? ‘या’ आहेत तारखा!

WhatsApp Group

Monsoon : मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी गुरुवारी दिलासादायक बातमी आली. मान्सून काल म्हणजेच 08 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला. भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जात आहे. हवामान खाते आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये मान्सूनच्या आगमनाच्या तारखेचा मागोवा घेत आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचेल?

IMD प्रादेशिक हवामान केंद्राचे (मुंबई) प्रमुख एसजी कांबळे यांनी सांगितले की, मान्सूनच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. दोन ते तीन दिवसांनी मान्सून महाराष्ट्रात कधी पोहोचेल याची माहिती हवामान विभाग देऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. साधारणपणे 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात पोहोचतो आणि 11 जूनपर्यंत मुंबईत पोहोचतो.

हेही वाचा – WTC Final 2023 : आई गं…! भारताच्या खेळाडूचा हात मोडता मोडता वाचला, पाहा Video

नकाशानुसार मान्सून साधारणपणे 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचतो. यानंतर पुढे सरकत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये 15 जूनला पोहोचते. तर, 20 जून रोजी ते गुजरातच्या अंतर्गत भागात, मध्य प्रदेशातील मध्य भाग आणि उत्तर प्रदेशात धडकते. मात्र, या राज्यांमध्ये मान्सूनच्या आगमनाची कोणतीही तारीख हवामान खात्याने दिलेली नाही. मान्सूनच्या हालचालींवर हवामान खाते सातत्याने लक्ष ठेवून आहे.

दिल्लीत मान्सून कधी दाखल होतो?

हवामान खात्यानुसार, मान्सून साधारणपणे 30 जूनपर्यंत पंजाब, हरयाणा आणि दिल्लीत पोहोचतो. यंदा केरळमध्ये मान्सून उशिरा दाखल झाला आहे, मात्र इतर राज्यांमध्येही मान्सून उशिरा पोहोचेल, अशी गरज नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. दुसरीकडे, चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर, येत्या दोन-तीन दिवसांत येथे मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment