कोकणचा, द्वारकेचा ‘पाणबुडी प्रकल्प’ आहे तरी काय?

WhatsApp Group

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढवण्यासाठी 2018 मध्ये पाणबुडी प्रकल्पाची (Submarine Project) घोषणा करण्यात आली होती. देशातील हा पहिला पाणबुडी प्रकल्प निवती रॉक्सजवळ समुद्रात बांधला जाणार होता. पाण्याखालील जगाचा शोध घेणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाण्याची शक्यता असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले. ”खोट्या बातमीकांवर विश्वास ठेवू नका. हा आपल्या राज्याचा प्रकल्प आहे, तो राज्यातून बाहेर जाणार नाही”, असे शिंदे म्हणाले.

केंद्र सरकारच्या सागर माला योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील वेंगुर्ला निवती रॉक्स आणि गुजरातमधील द्वारका या ठिकाणी पाणबुडी प्रकल्पाला मंजुरी मिळाली. या प्रकल्पासाठी 56 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, हा प्रकल्प मार्गी लागला नाही. या पाणबुडी प्रकल्पात पर्यटकांना समुद्राखालचे अद्भुत जग पाहता येईल. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगारही मिळणार आहे.

हेही वाचा – ‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ अभियान राज्यभर राबवणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

आता असाच एक प्रकल्प गुजरातला होणार असल्याचे बोलले जात आहे. गुजरात सरकार आणि माझगाव डॉकयार्ड द्वारकेच्या समुद्रात पाणबुडी प्रकल्प राबवत आहेत. जानेवारीत व्हायब्रेट गुजरात समिटमध्ये याची अधिकृत घोषणा केली जाईल, असे वृत्त आहे. द्वारकेत होणाऱ्या प्रकल्पातील पाणबुडी 35 टन वजनाची आहे. यात 30 प्रवासी बसू शकतात. समुद्रात 300 फूट खोल जावून लोकांना निसर्गाचं अंतरंग अनुभवता येणार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment