Apaar ID : देशभरातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेले ‘अपार आयडी’ म्हणजे काय? ते डाऊनलोड कसं कराल?

WhatsApp Group

APAAR ID (Automated Permanent Academic Account Registry) ही भारत सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी एक एकीकृत ओळख प्रणाली तयार करणे, त्यांची शैक्षणिक माहिती अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करणे आणि शैक्षणिक अनुभव अधिक प्रभावी बनवणे हा त्याचा उद्देश आहे. शिक्षण मंत्रालय आणि भारत सरकारने संपूर्ण भारतातील शालेय विद्यार्थ्यांसाठी युनिक आयडी क्रमांक तयार करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार APAAR ID (One Nation One Student ID) कार्ड लाँच केले.

शाळा आणि महाविद्यालये पालकांची संमती घेतल्यानंतरच ‘अपार आयडी’ कार्डसाठी त्यांच्या विद्यार्थ्यांची नावे नोंदवू शकतात. ज्या पालकांची मुले ‘अपार आयडी’ कार्डसाठी अर्ज करतील त्यांची संमती अनिवार्य आहे कारण ‘अपार आयडी’ कार्डमध्ये मुलांचे वैयक्तिक तपशील असतील, जसे की रक्तगट, वजन, उंची इ.

‘अपार आयडी’ बाबत…

युनिक आयडेंटिफिकेशन : प्रत्येक विद्यार्थ्याला 12-अंकी अद्वितीय ‘अपार आयडी’ दिला जाईल, जो संपूर्ण शैक्षणिक प्रणालीमध्ये त्यांची कायमची डिजिटल ओळख असेल.
डेटाचे केंद्रीकृत व्यवस्थापन : या आयडीसह, विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिका, पदव्या, प्रमाणपत्रे आणि सह-शैक्षणिक यश डिजिटली सुरक्षित ठेवू शकतात.
डिजीलॉकरसह एकत्रीकरण : ‘अपार आयडी’ डिजीलॉकरशी जोडलेला आहे, जेथे विद्यार्थी त्यांचे शैक्षणिक दस्तऐवज सुरक्षित ठेवू शकतात. हे क्रेडिट मॅनेजमेंट सोपे करून, ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC) शी देखील जोडलेले आहे.

हेही वाचा – अभिनेता विक्रांत मॅसीची 37व्या वर्षी अभिनयातून निवृत्ती!

आवश्यक कागदपत्रे :

विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, लिंग
मोबाईल नंबर
पालकांचे नाव
आधार कार्ड

स्टेप्स :

  • अल्पवयीन विद्यार्थ्यांसाठी शाळेने पालकांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
  • DigiLocker वेबसाइटला भेट द्या किंवा ॲप डाऊनलोड करा.
  • “साइन अप” वर क्लिक करा आणि मोबाईल नंबर आणि आधार कार्ड माहिती प्रविष्ट करा.
  • ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

APAAR ID साठी नोंदणी करा :

  • DigiLocker वर लॉगिन करा.
  • “Academy Bankoff Credits” विभागात जा.
  • “माय अकाऊंट” वर क्लिक करा आणि “विद्यार्थी” पर्याय निवडा.
  • शाळा/कॉलेज माहिती आणि इतर तपशील भरा.
  • आधार कार्ड, फोटो, रहिवासी प्रमाणपत्र इ. अपलोड करा.
  • फॉर्म सबमिट करा.

कोण अर्ज करू शकतो?

  • किमान वय 5 वर्षे असावे.
  • मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठात नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

‘अपार आयडी’ कसे डाउनलोड करावे?

  • अधिकृत वेबसाइट : ‘अपार आयडी’ च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • लॉगिन : तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर करा, जर तुम्ही आधीच नोंदणी केली नसेल, तर “नवीन नोंदणी” वर क्लिक करा आणि तुमचा तपशील प्रविष्ट करा.
  • ‘अपार आयडी’ : लॉगिन केल्यानंतर, ‘अपार आयडी’ डाउनलोड करा पर्यायावर क्लिक करा.
  • OTP पडताळणी : तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. हे प्रविष्ट करून सत्यापन पूर्ण करा.
  • डाऊनलोड करा : पडताळणी केल्यानंतर, “PDF डाउनलोड करा” बटणावर क्लिक करा.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment