Kerala Train Fire : ‘त्या’ शाहरुखला रत्नागिरीतून अटक..! ट्रेनमध्ये तिघांना जिवंत जाळल्याचा आरोप 

WhatsApp Group

Kerala Train Fire : केरळमध्ये रेल्वेत आग लावून 3 जणांची हत्या करून फरार झालेल्या शाहरुख सैफीला अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसच्या संयुक्त पथकाने त्याला मंगळवारी आणि बुधवारी मध्यरात्री महाराष्ट्रातील रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून अटक केली.

रविवार, 2 एप्रिल रोजी रात्री 9:45 वाजता कोझिकोड शहर ओलांडल्यानंतर अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस कोरापुझा रेल्वे पुलावर पोहोचली तेव्हा सैफीने त्याच्या सहप्रवाशांवर काही ज्वलनशील द्रव ओतले आणि त्यांना आग लावली, असा आरोप आहे. कोझिकोडमधील एलाथूर रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर एक वर्षाचे बालक आणि एका महिलेसह तीन जण मृतावस्थेत आढळून आले, तर या घटनेत इतर आठ प्रवासी जखमी झाले.

हेही वाचा –  उगाच बढाया..! Maruti च्या 2 गाड्या सेफ्टीमध्ये पूर्ण फेल; लाखो लोक चालवतात!

शाहरुख सैफीचे लोकेशन काल रत्नागिरीत ट्रेस करण्यात आले. डोक्याला दुखापत झाल्याने तो रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आला होता. केरळमध्ये ट्रेनमधून खाली उतरताना पडल्याने त्याला ही दुखापत झाली. मात्र, उपचार पूर्ण न करताच त्याने रुग्णालयातून पळ काढला.

यानंतर पोलिसांनी रत्नागिरी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवून शाहरुख सैफीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. तो सध्या रत्नागिरी येथील रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) कोठडीत असून त्याची चौकशी अद्याप सुरू झालेली नाही. केरळ पोलीसही रत्नागिरीत पोहोचले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment