भारीच..! २४ वर्षाच्या पोरासोबत ४२ वर्षाच्या आईनंही मिळवली सरकारी नोकरी; नक्की वाचा!

WhatsApp Group

Kerala PSC Examination Results : केरळमधील मलप्पुरममध्ये ४२ वर्षीय आई आणि तिचा २४ वर्षीय मुलगा दोघेही एकत्र सरकारी नोकरीत रुजू होणार आहेत. दोघांनी एकाच वेळी लोकसेवा आयोगाची (public service commission) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आईनं एलजीएस परीक्षा उत्तीर्ण केली आहे, तर दुसरीकडं मुलगा एलडीसी उत्तीर्ण झाला आहे. ४२ वर्षीय बिंदू सांगतात, की मुलगा दहावीत असताना त्यांनी त्याला शिकवण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. याच काळात त्यांना केरळ लोकसेवा आयोगाच्या (PSC) परीक्षेची तयारी करण्याची प्रेरणा मिळाली. आता आई आणि मुलगा दोघेही सरकारी नोकरीत एकत्र येत आहेत. खरं तर बिंदू या व्यवसायानं गेल्या दहा वर्षांपासून अंगणवाडी शिक्षिका आहेत.

बिंदू यांनी एका टीव्ही चॅनलवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितलं, की त्या ‘लास्ट ग्रेड सर्व्हंट’ (LGS) परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत, ज्यामध्ये त्यांना ९२वा क्रमांक मिळाला आहे. तर त्यांचा २४ वर्षांचा मुलगा लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) परीक्षेत ३८व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. आपल्या मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देताना बिंदुंना प्रेरणा मिळाली, त्यानंतर त्यांनी कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला. यासोबतच त्यांनी ग्रॅज्युएशननंतर मुलगा विवेक यांनाही तिथं प्रवेश मिळवून दिला.

हेही वाचा – Rakshabandhan 2022 : ६ बहिणींमध्ये ८० रुपये..! रक्षाबंधनासाठी भावानं काढलं ‘भारी’ बजेट; पाहा VIDEO

दोघांनी अभ्यास कसा केला?

बिंदुंनी सांगितलं, की त्यांनी एलजीएससाठी दोनदा आणि एलडीसीसाठी एकदा प्रयत्न केला, चौथ्या प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. ”माझं खरं लक्ष्य आयसीडीएस पर्यवेक्षक परीक्षा होतं, तर एलजीएस परीक्षा उत्तीर्ण होणं हा ‘बोनस’ आहे. गेल्या १० वर्षांपासून मी अंगणवाडी शिक्षिका आहेत. पीसीएस परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या माझ्या वारंवार प्रयत्नांमध्ये, माझे शिक्षक, मित्र आणि कोचिंग सेंटरमधील माझ्या मुलानं प्रोत्साहन दिलं”, असं बिंदू म्हणाल्या. त्यांचा मुलगा विवेक म्हणाला, ”आम्ही दोघे एकत्र अभ्यास करत नव्हतो, पण काही विषयांवर चर्चा करायचो. मी एकट्यानं अभ्यास करणं पसंत करतो. याव्यतिरिक्त, आई नेहमी अभ्यास करत नव्हती. अंगणवाडीच्या ड्युटीनंतर वेळ मिळेल तेव्हाच ती अभ्यास करत होती.”

हेही वाचा – Rakshabandhan : ‘ही’ आहे देशातील सर्वात महागडी राखी..! किंमत ऐकली तर म्हणाल, “तिजोरीतच ठेवली पाहिजे”

केरळमध्ये पदांसाठी वयोमर्यादा..

केरळमध्ये या पदांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे आहे परंतु विशेष श्रेणींसाठी वयोमर्यादा शिथिल आहे. OBC प्रवर्गासाठी वयात तीन वर्षांची सूट आहे तर SC/ST आणि विधवा उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर मूकबधिर आणि अंधांसाठी ही सवलत १५ वर्षांची आहे आणि दिव्यांगांसाठी १० वर्षांची सूट या पदांसाठी देण्यात आली आहे.

Leave a comment